JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी! क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली; BCCI ने IPL 2020 चं वेळापत्रक केलं जारी

मोठी बातमी! क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली; BCCI ने IPL 2020 चं वेळापत्रक केलं जारी

IPL 2020 चं वेळापत्रक जारी करण्यात आलं असून आता पुन्हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळणार आहे

जाहिरात

याआधी 2014मध्ये आयपीएलचे काही सामने युएइमध्ये झाले होते. 2014मध्ये एका संघाने युएइच्या मैदानावर जास्तीत जास्त षटकार मारण्याची कामगिरी केली. मात्र एका संघाचा फ्लॉप होता. यावेळी या संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कोरोनाच्या कहरात आयपीएल 2020 चे क्रिकेट सामने पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज बीसीसीआयने आयपीएल 2020 चं वेळापत्रक जारी केलं आहे. यंदा UAE मध्ये आयपीएलचे सामने होणार आहे. या सीजनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे. रविवार, 20 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स Vs XI पंजाब सोमवार, 21 सप्टेंबर - सनराईज हैद्राबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पण अशाही परिस्थितीत इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचे सामने येत्या 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. गतविजेती आयपीएलची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक खास रिंग आणली आहे.  ही रिंग प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूला एक डिव्हाइस वापरावे लागणार आहे. या डिव्हाइसमुळे खेळाडू हार्ट रेट, शरिरात होणारे बदल, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचे तापमान दाखवणार आहे. खेळाडूला काही त्रास झाला तर याची माहिती लगेच डॉक्टरांच्या टीमला कळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या