JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोण होतास तू, काय झालास तू! ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर पाणी द्यायची वेळ

कोण होतास तू, काय झालास तू! ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर पाणी द्यायची वेळ

मागच्या आठवड्यापर्यंत भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs Australia) टीम पेन (Tim Paine) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता, पण याच टीम पेनवर आता खेळाडूंना पाणी द्यायची वेळ आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : मागच्या आठवड्यापर्यंत भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs Australia) टीम पेन (Tim Paine) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता, पण याच टीम पेनवर आता खेळाडूंना पाणी द्यायची वेळ आली आहे. बिग बॅश लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने टीम पेनला अंतिम-11 खेळाडूंमध्ये स्थान दिलं नाही, त्यामुळे पेनला मैदानात खेळाडूंसाठी पाणी घेऊन जावं लागलं. टीम पेन याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जणांनी त्याच्या या फोटोला चांगलंच ट्रोल केलं आहे. भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम पेनवर चौफेर टीका होत आहे. पेनच्या नेतृत्वात लागोपाठ दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत बॉर्डर-गावसरकर ट्रॉफीमध्ये पराभव झाला. यानंतर पेनला कर्णधारपदावरून काढून टाकावं, अशी मागणी होत आहे. टीम पेनच्या मैदानातील वर्तणुकीमुळेही क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटू नाराज झाले. सिडनी टेस्टमध्ये पेनने अश्विनला स्लेजिंग करताना अपशब्द वापरले. तसंच त्याने कॅचही सोडले, त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंकत असलेली मॅच ड्रॉ झाली. यानंतर ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाने मॅच गमावली. गाबाच्या मैदानात 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला, एवढंच नाही तर त्यांनी सीरिजही गमावली. टीम पेनचं कर्णधारपद जाणार? भारताविरुद्धच्या पराभवामुळे टीम पेनच्या कर्णधारपदावरही संकट ओढावलं आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाची टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार टीम पेनला कर्णधारपद गमवावं लागू शकतं. पॅट कमिन्स याचं नाव ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार म्हणून आघाडीवर आहे, तर इयन हिली यांनी स्टीव्ह स्मिथला पुन्हा कर्णधार करावं, अशी मागणी केली आहे. बॉलशी छेडछाड केल्यानंतर स्टीव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली, ज्यामुळे त्याचं कर्णधारपद गेलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या