JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / आनंद महिंद्रांनी दिलेलं वचन पाळलं, नटराजनला दिलं स्पेशल गिफ्ट

आनंद महिंद्रांनी दिलेलं वचन पाळलं, नटराजनला दिलं स्पेशल गिफ्ट

नटराजन (T Natrajan) याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्याला एसयूव्ही थार गिफ्ट दिल्याची माहिती दिली. नटराजन याने याबद्दल आनंद महिंद्रा यांना स्वत: सही केलेली गाबा टेस्टमध्ये वापलेली जर्सी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली आहे.

0106

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून टी नटराजन (T Natrajan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच दौऱ्यामध्ये नटराजन याने धमाकेदार कामगिरी केली.

जाहिरात
0206

नटराजन याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्याला एसयूव्ही थार गिफ्ट दिल्याची माहिती दिली. नटराजन याने याबद्दल आनंद महिंद्रा यांना स्वत: सही केलेली गाबा टेस्टमध्ये वापलेली जर्सी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली आहे.

जाहिरात
0306

'भारताकडून क्रिकेट खेळणं माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मला मिळालेलं प्रेम अद्भूत आहे. मी आज घरी महिंद्रा थार आणली. आनंदर महिंद्रा सरांचे आभार, ज्यांनी माझ्या क्रिकेट प्रवासाला ओळख दिली आणि मला प्रोत्साहित केलं. मी सही केलेली जर्सी तुम्हाला पाठवत आहे,' असं नटराजन म्हणाला.

जाहिरात
0406

नटराजन आता सनरायजर्स हैदराबाद टीमशी जोडला गेला आहे. 2017 साली नटराजन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता. त्यावेळी पंजाबकडून नटराजनला 6 मॅच खेळण्याची संधी मिळाली होती, यात त्याने दोनच विकेट घेतल्या. युएईमध्ये मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना त्याने 16 मॅचमध्ये 8.02 च्या इकोनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या.

जाहिरात
0506

29 वर्षांच्या नटराजनने आतापर्यंत भारताकडून 7 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत, यामध्ये 1 टेस्ट, 2 वनडे आणि 4 टी-20 मॅचचा समावेश आहे. नटराजनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 विकेट आहेत.

जाहिरात
0606

t natarajan team india

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या