मुंबई, 10 जून: आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकणारे भारताचे बॉक्सर डिंको सिंह (Dingko Singh) यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरनं आजारी होते. डिंको सिंह यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होत असतानाच त्यांना मागच्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे झाले होते. कोरोनावर विजय मिळवणाऱ्या डिंको सिंह यांचा कॅन्सर विरुद्धच्या लढाईत पराभव झाला. डिंको यांनी 1998 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मुळचे मणिपूरचे असलेले डिंको हे भारताची महान बॉक्सर मेरी कोमसह (Mary Kom) अनेक चॅम्पियन खेळाडूंचे रोल मॉडेल होते. त्यांना 1998 साली अर्जुन तर 2013 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. डिंको सिंह यांच्या निधनाबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर विजेंदर सिह यांनी शोक व्यक्त केला आहे.
WTC Final आधी न्यूझीलंडला धक्का! दुखापतीमुळे विल्यमसन आऊट ‘हा’ खेळाडू कॅप्टन डिंको सिंह यांनी 1997 साली बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी पुढच्याच वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. डिंको सिंह हे नौदलामध्ये कार्यररत होते. मात्र त्यांची तब्येत बिघडल्यापासून ते घरीच होते. गेल्या वर्षी त्यांची तब्येत अधिक खालावली. त्यावेळी त्यांना उपचारासाठी मणिपूरहून एअर लिफ्ट करुन दिल्लीला नेण्यात आले होते.