हॅरी ब्रूक
बर्मिंगहम, 17 जून : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी 78 षटकात 8 बाद 398 धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरी ब्रूकच्या विकेटची चर्चा जोरदार झाली. मधल्या फळीतला फलंदाज ब्रूक ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गोलंदाज नाथन लायनलासुद्धा विश्वास बसला नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रूक 38व्या षटकात बाद झाला. फिरकीपटू लियोनने टाकलेल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गेली. ब्रूकला लेग स्टम्पवर शॉर्ट लेंथ चेंडू लायनने टाकला. हा चेंडू जास्त वळला आणि बाऊन्स झाला. ब्रूकने फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडूला बॅट लागली नाही. चेंडू त्याच्या पॅडवर आदळून हवेत उडाला. विकेटकिपरनेही तो झेलण्याचा प्रयत्न केला पण चेंडू ब्रूकच्या पाठीवर आदळून स्टम्पला लागला. त्यामुळे ब्रूकला बाद होऊन तंबूत परतावं लागलं.
बाऊन्सर आदळला हेल्मेटवर, कर्णधाराने जखमी अवस्थेत सोडलं मैदान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या एशेस मालिकेत पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर चौकार मारत इंग्लंडने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. दिवसअखेर पहिला डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केलं. इंग्लंडकडून जो रूटने नाबाद 118 धावा केल्या. त्याच्यासोबत ब्रूकने 51 धावांची भागिदारी केली. रूटशिवाय सलामीवर जॅक क्रॉलीने 61 धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोरने 78 धावा केल्या. ओली पोप 31 धावांवर बाद झाला. तर कर्णधार बेन स्टोक्स एका धावेवर बाद झाला.