JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्टोक्सने स्मिथसाठी लावली 'स्पेशल फिल्डिंग', इंग्लंडने 59 चेंडूत दिली नाही एकही संधी

स्टोक्सने स्मिथसाठी लावली 'स्पेशल फिल्डिंग', इंग्लंडने 59 चेंडूत दिली नाही एकही संधी

पहिल्या दिवशी इंग्लंडने 393 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 311 धावा केल्या आहेत.

जाहिरात

स्मिथसाठी स्पेशल फिल्डिंग

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बर्मिंगहम, 18 जून : एशेस मालिकेत इंग्लंडने पहिल्या दिवशी फलंदाजीत कमाल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा भक्कमपणे सामना केला. उस्मान ख्वाजाने मैदानावर टिकून राहत एका बाजूने किल्ला लढवला. त्याने शतक साजरं केलं. दरम्यान, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आणि धावा काढण्यापासून रोखण्यासाठी क्षेत्ररक्षणात कमालीचे प्रयोग केले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेच स्टिव्ह स्मिथला बाद केलं. स्टिव्ह स्मिथ त्याच्या गोलंदाजीवर पायचित झाला. स्मिथने 59 चेंडूंचा सामना केला. यात स्मिथला एकदाही चौकार मारता आला नाही. बेन स्टोक्सने रचलेल्या फिल्डिंगच्या सापळ्यात स्मिथ अडकला.  स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग दोन विकेट गेल्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्मिथला बाद करण्यासाठी दोन्ही बाजूला स्लिपमध्ये फिल्डर उभा केले होते. स्मिथला यामुळे पहिल्या डावात फक्त 16 धावाच करता आल्या.   ब्रॉड पुन्हा एकदा वॉर्नरसाठी बनला काळ; स्टुअर्ट मॅकग्राच्या क्लबमध्ये झाला सामील स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेल्या अकराव्या षटकात वॉर्नर आणि लॅब्युशेन पहिल्या दोन चेंडूवर बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या हॅटट्रिक बॉलवर फलंदाजीला स्मिथ मैदानात उतरला. यावेळी बेन स्टोक्सने नेट रणनितीचा वापर केला. स्मिथसाठी स्लिपमध्ये चार, लेग स्लिपला दोन, एक गली आणि एक शॉर्ट मिडविकेटला फिल्डर उभा केला.

संबंधित बातम्या

इंग्लंडने रचलेल्या या सापळ्याचा स्मिथच्या फलंदाजीवर परिणाम दिसला. बचावात्मक पवित्रा घेत स्मिथने फलंदाजी केली. मात्र 59 चेंडू खेळूनही स्मिथला एकही चौकार मारता आला नाही. त्याने केवळ 16 धावा केल्या. बचावात्मक खेळण्याच्या नादातच स्टोक्सच्या चेंडूवर स्मिथ पायचित झाला. इंग्लंडच्या या रणनितीचं कौतुक केलं जात आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने 393 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 311 धावा केल्या आहेत. अद्याप ऑस्ट्रेलिया 82 धावांनी पिछाडीवर आहे. उस्मान ख्वाजा आणि एलेक्स कॅरी मैदानात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या