JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अर्जुननं धरली विराट कोहलीची वाट; इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

अर्जुननं धरली विराट कोहलीची वाट; इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन जिममध्ये आणि मैदानावर मेहनत घेत आहे. त्यानं नुकताच आपल्या इन्स्टास्टोरीवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली आपल्या बहारदार खेळासोबतच आपल्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट टीममध्ये फिटनेसचा ट्रेंड आणण्याचं श्रेय त्यालाच दिलं जातं. 2014 नंतर कोहलीनं जंक फूड खाणं बंद केलं आणि फिट राहण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार आणि जीवनशैली स्वीकारली. त्याच्या तंदुरुस्त शरीरामुळे त्याला मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यात मदत झाली. शुभमन गिल, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल या सर्वांनी कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवत सिक्स-पॅक अॅब्ज केले. यामध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर वर उल्लेख केलेल्या स्टार्सच्या यादीत सहभागी होत आहे. उच्चस्तरीय क्रिकेटपटू बनण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन जिममध्ये आणि मैदानावर मेहनत घेत आहे. त्यानं नुकताच आपल्या इन्स्टास्टोरीवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन आपले सिक्स-पॅक अॅब्ज दाखवताना दिसत आहे. हा फोटो बघून अनेकांना विराटची आठवण झाली. ज्युनिअर तेंडुलकर गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमचा सदस्य आहे. त्याने या वर्षीच आयपीएलमधील पहिली मॅच खेळली. आयपीएल 2023 मधील एका मॅचमध्ये अर्जुनची मुंबई इंडियन्समधील ‘ड्रेसिंग रूम प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली होती. वडील सचिन तेंडुलकर यांच्या हस्तेच त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन गोव्याच्या टीमकडून खेळतो. पदार्पणाच्याच मॅचमध्ये शतक झळकावत त्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं. सचिन तेंडुलकरनंही रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. स्पर्धा फारच जास्त असल्यामुळे मुंबईच्या टीम सेटअपमध्ये अर्जुनला संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याला गोव्यात शिफ्ट व्हावं लागलं. त्या पूर्वी अर्जुन काही महिने चंडीगड येथील क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. भारताचा धडाकेबाज माजी खेळाडू युवराजसिंग याचे वडील योगराजसिंग यांनी अर्जुनला प्रशिक्षण दिलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: त्याला योगराजसिंग यांच्याकडे पाठवलं होतं, अशी चर्चा आहे. तिथे त्यानं बॉलिंग आणि बॅटिंगचा कसून सराव केला. एकूणच अर्जुन तेंडुलकर मैदानात आणि जिममध्ये कष्ट करताना दिसत आहे. तसंच अर्जुन त्याच्या सिक्स पॅक अॅब्जमुळे सोशल मीडियावर व्हायरल होऊन आपला प्रभाव निर्माण करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या