Axar Patel Engagement: टीम इंडियाचा ऑल राऊंडर अक्षर पटेलनं वाढदिवशीच एक मोठा निर्णय घेतला. त्याने गर्लफ्रेंड मेहाशी साखरपुडा केला आहे.
मुंबई, 21 जानेवारी : टीम इंडियाचा ऑल राऊंडर अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याच्या 28 व्या वाढदिवशी एक मोठा निर्णय घेतला. त्याने गर्लफ्रेंड मेहासोबत साखरपुडा केला. (PC: Meha Instagram)
अक्षर आणि मेहा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मेहा ही डायटेशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. तिचा एक टॅटू सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या टॅटूवरून भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनाडकतनंही तिला मजेदार प्रश्न विचारला आहे.
मेहानं हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू काढला असून हातावर 'अक्ष' असे लिहिले आहे.
अक्षर पटेलनं वाढदिवशीच साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती. त्याने शेअर केलेल्या फोटोमधूनच हे स्पष्ट होत आहे.