JOIN US
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / गोरेगावात चक्क गाई, म्हशींच्या गोठ्यांवर 'एसआरए' प्रकल्प राबवला !

गोरेगावात चक्क गाई, म्हशींच्या गोठ्यांवर 'एसआरए' प्रकल्प राबवला !

मुंबईचं उपनगर असलेल्या गोरेगाव परिसरात कधीकाळी गाई म्हशींचे गोठे होते. पण याच जागांवर बिल्डर आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांनी संगनमत पुनर्विकासाचा प्रकल्प मंजूर करून घेतला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई मुंबई, 14 जुलै : झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प हा कुणासाठी राबवला जातो. असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल झोपडपट्टीत रहाणाऱ्या लोकांसाठी. पण तसं नाहीए मुंबईतल्या एसआरएच्या अधिकाऱ्यांचा उदारपणा एवढा की त्यांनी हा प्रकल्प चक्क गायी, म्हशींसाठी राबवलाय. एक नाही दोन नाही तर तब्बल २१ गायी म्हशींच्या गोठ्यांचा एसआरए प्रकल्पात समावेश करुन गोठे मालकांना लाभार्थी देखील करून घेण्यात आलंय. मुंबईचं उपनगर असलेल्या गोरेगाव परिसरात कधीकाळी गाई म्हशींचे गोठे होते. पण याच जागांवर बिल्डर आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांनी संगनमत पुनर्विकासाचा प्रकल्प मंजूर करून घेतला. आणि मुबलक एफएसआय लाटला आणि गोठे मालकांना लाभार्थी सुद्धा करून घेतलं. थोडक्यात जिथं गाई, म्हशींसाठी गोठे होते तिथंच एसआरए प्रकल्प राबवण्यात आलाय. खरंतर एसआरए योजनेत गाई म्हशींच्या गोठ्यांचा पुनर्विकास करण्याचं कुठे अंतर्भूत नाहीये तरीही बिल्डरांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेमालूमपणे एसआरएचा प्रकल्प राबवत त्याच जागेवर टोलेजंग इमारती उभा केल्या आणि करोडो रुपये कमावलेत. आरटीआय कार्यकर्ते निलेश केवळे यांनी हा सगळा घोटाळा उघडकीस आणलाय. २००६ सालापासून हे गोठ्यांबाबतचं एसआरए प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अशा राखीव जागांचा एसआरए प्रकल्पात समावेशही करता येत नाही. विकासकानं गोठ्यांचा समावेश चक्क पात्रता यादीत केलाय. इतकंच नाही तर प्रत्यक्षात ज्या जागेवर तीनचं गोठे होते तिथं विकासकाने इतरठिकाणचे १८ गोठे कागदोपत्री एकत्र दाखवून त्यांच्या मालकांना एसआरए प्रकल्पात लाभार्थी म्हणून पात्र करुन घेतलं. एवढंच नाहीतर आजूबाजूच्या बीएमसीच्या मोकळ्या जागेवर हे गोठे दाखवून ती जागाही गिळंकृत केलीय. मुंबईसारख्या शहरात माणसं गुराढोरांसारखी छोट्यांशा जागांमध्ये कोंबली जातात. याच लोकांना जरासा मोकळा श्वास मिळावा म्हणून हे एसआरए प्रकल्प राबवले जातात. पण इथं तर एसआरए आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी चक्क गाई म्हशींना सुद्धा घरं दिल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. एसआरए प्रकल्प राबवताना अधिकाऱ्यांचीं मजल कुठवर जाऊ शकते याचं हे नमुनेदार उदाहरण म्हणावं लागेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या