JOIN US
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / शिर्डीत विमान आले भारी अन् एसटीच मिळेना दारी !

शिर्डीत विमान आले भारी अन् एसटीच मिळेना दारी !

ज्या गावांत एसटी जात नाही त्या गावात विमानतळ आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. विकासाची ही उलटी गंगा वाहिलीये शिर्डीच्या काकडी गावात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिष दिमोटे, शिर्डी 26 सप्टेंबर : अखेर शिर्डी विमानतळावर पहिलं विमान दाखल झालंय. पण ज्या गावांत एसटी जात नाही त्या गावात विमानतळ आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. विकासाची ही उलटी गंगा वाहिलीये शिर्डीच्या काकडी गावात. शिर्डी विमानतळ ज्या काकडी गावात आहे त्या गावात एसटीही येत नाही. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी राज्यसरकारने शिर्डी जवळच्या काकडी गावात विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला. 1350 एकर क्षेत्र विमानतळासाठी संपादित करण्यात आले. गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता केवळ केवळ आश्वासनं दिली गेली. गावाचा संपूर्ण विकास केला जाणार, गावातील रस्ते,पाणी,वीज याची समस्या सोडवणार, शाळा काॅलेज बांधणार, विमानतळावर भुमीहिनांना नोकरी देणार अशी एक ना अनेक आश्वासने दिली गेली मात्र त्याची कोणतीही पुर्तता न केल्याने काकडी गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आम्हाला विमान बघण्याची होस नाही आमच्या गावाचा विकास होणार, प्रत्येक घरातील माणसाला रोजगार मिळणार या आशेने आम्ही आमच्या जमिनी दिल्या मात्र सरकारने आमची फसवणूक केल्याची भावना गावकरी व्यक्त करताहेत. शहर किंवा गावच्या विकासात सर्वात शेवटी विमानतळाचा क्रम लागतो. पण शिर्डी विमानतळाच्या निमित्तानं सरकारनं विकासाची व्याख्याच बदललीये हे मात्र खरंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या