पुणे, 15 जुलै : रविंद्र महाजनींच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे. मध्यरात्री रविंद्र महाजनीच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. शुक्रवारी रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर पुण्याच्या तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये आला होता. यानंतर त्यांचं निधन झालं असल्याची घटना उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. गश्मिर मुंबईत राहायला आहे. शवविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गश्मिर आईसोबत मुंबईत राहतो तर रविंद्र महाजनी पुण्यात एकटेच राहत असल्याची माहिती आहे. चेहरा काळा पडला होता.. दरम्यान रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. त्यांच्या मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांनी पिवळ्या रंगाचं टिशर्ट घातलं होतं. त्यांच्या मृतदेहाशेजारी WHEY नावाच्या प्रोटीन पावडरचा डबा दिसत आहे. रविंद्र महाजनी बेडच्या खाली, डोक्यावर पडले आहेत. याशिवाय शेजारी काळ्या रंगाचं ऑइलही दिसत आहे. नेमकं त्यांच्या शेजारी असलेल्या काळ्या रंगाचं द्रव्य काय आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र चेहरा अत्यंत काळा पडला आहे. बेडशेजारी काही शूजही दिसत आहेत.
वडिलांचं 15 लाखांचं कर्ज फेडलं एका मुलाखतीत गश्मीरने सांगितलं, वयाच्या 15व्या वर्षी पुण्यात स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. त्यावेळेस आम्ही आर्थिक संकटात होतो. आमचं घर बँकेत गहाण होतं. 40-50 लाखांचं कर्ज होतं. डान्स अकॅडमीनंतर 2 वर्षांनी स्वत:ची कार्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. त्यातून पॅन इंडिया इव्हेंट्स करायचो. 21 व्या वर्षी 5-6 वर्षात आम्ही 40-50 लाखांचं कर्ज फेडले. आमचं घर सोडवलं. 17 व्या वर्षी मी इनकम टॅक्स फाइल करायचो.
आईसोबत जवळीक, वडिलांशी दुरावा? गश्मीरचं त्याच्या आईबरोबर फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गश्मीरची आई त्याच्याबरोबर मुंबईत राहते. तर रवींद्र महाजनी मागील 8-9 महिन्यांपासून तळेगाव येथे भाड्याच्या घरात राहात होते. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेक रिअलिटी शोमध्ये काम करत असतो. तिथे प्रत्येक वेळी त्याची आई त्याच्याबरोबर असते. सोशल मीडियावरही गश्मीर आईबरोबरचे फोटो शेअर करतो. वडिलांचा कोणताही उल्लेख त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही. वडिलांपेक्षा आईबरोबर गश्मीरचा चांगला बॉन्ड आहे. रविंद्र महाजनी पुण्यात एकटे राहत असल्याचं समोर आलं आहे. तर गश्मिर आई आणि पत्नी-मुलासोबत मुंबईत राहतो.