चेन्नईचा रिकव्हरी रेट 92.68, दिल्ली - 90.76, तर मुंबईचा 88.81 टक्के एवढा आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली आहे.
कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली आहे. रुग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची आकडेवारी पुढे आलीय.
पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के एवढा आहे. चेन्नई, दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर वन झाले आहे.
कोरोनाच्या बाबतीत पुणे बनलं होतं नंबर वन तेच पुणे आता रिकव्हरीत बनलं नंबर वन. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
शनिवारी दिवसभरात पुण्यात 329 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 774 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 59 हजार 406 झालीय. तर 6 हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.