JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video

श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व नतमस्तक झाले. यावेळी गणपती बाप्पा मोरया…माऊली माऊलीच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 10 जून : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. यावेळी गणपती बाप्पा मोरया…माऊली माऊलीच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अश्वांचे पूजन करण्यात आले. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. माऊलींचे अश्व आणि गणरायाची अनोखी भेट  कर्नाटक बेळगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. ‘गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो. बाप्पाचे असेच आशिर्वाद कायम वारक-यांवर असावे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे.

काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. आता श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतील. ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात’, असं यावेळी महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम, एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज; वारकरी हरिनामात दंग

संबंधित बातम्या

गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे यावर्षी वारीची शुभ आणि उत्साहात सुरुवात झालेली पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे, असं दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या