पुणे, 14 जुलै : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. ही समजूत सिद्ध करणारं एक लग्न पुण्यात झालंय. पुण्यातील अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी या डाऊन सिंड्रोम असलेल्या दोघांनी लग्नगाठ बांधलीय. ते दोघं आता सुखी संसाराची स्वप्न रंगवत आहेत. देशात या पद्धतीचं पहिलंच लग्न असल्याचा दावा केला जातोय. कसा जुळला योग? पुण्यातली अनन्या ही वाकडमधील सनशाईन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका आहे. तर विघ्नेश दुबईतील एका हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसर म्हणून 5 वर्षांपासून काम करतो. या दोघांचं लग्न काही दिवसांपूर्वी नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं.
विघ्नेशनं स्पेशल असलेल्या लोकांसाठी विवाहाच्या साइटवर नोंदणी केली होती. त्या मार्फत त्यांनी अनन्याच्या आई तेजस्विता यांच्याशी संपर्क साधला. मागच्या वर्षी व्हिडीओ कॉलद्वारे दोन्ही कुटुंबे जोडली गेली. अनन्या आणि विघ्नेश यांची एकमेकांशी ओळख झाली. विघ्नेशचे कुटुंब भारतात आलं आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याचा साखरपुडा केला. ‘अनन्या ला सगळ्या गोष्टी करायला आवडायच्या. ती 20 वर्षांची झाली तेव्हा तिने तिच्या आवडत्या हिरो सोबत लग्न करायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी आम्ही चिंतेत पडलो. मात्र हिच्या आयुष्यात हिला सांभाळणारा कोणीतरी मिळेल का याचा विचार करत होते. त्याच वेळी तिची विवाह नोंदणी केली आणि तिथेच विघ्नेश सापडला. अनन्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली. अनन्या आता तिच्या संसारात रमेल,’ अशी माहिती अनन्यच्या आई तेजस्विता सावंत यांनी दिलीय . 1000 रुपयांचं फेस मसाजर फक्त 200 रुपयांना, मेकअपचं इतकं स्वस्त साहित्य कुठे पाहिलंय का? अनन्या लहान असतानाच ती स्पेशल असल्याचं कुटुंबीयांना कळलं होतं. त्यावेळी अनन्याच्या वडिलांना काळजी वाटली. मात्र तिच्या आईनं धीर देत वडिलांची समजूत काढली. त्यानंतर दोघांनी मिळून सामान्य़ मुलीप्रमाणे अनन्याला वाढवलं. तिला हवं ते आणि हवं तसं करु दिलं. तिला स्वप्न पाहायला शिकवलं. अनन्या त्यांच्या कष्टाचं चिज करत सहाय्यक शिक्षिका बनली. डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? डाऊन सिंड्रोमला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात. यात मुलांच्या शरिराची वाढ संथ गतीने होत असते. त्यांचा बौद्धिक विकास व्हायलादेखील वेळ लागतो. चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमध्ये फरक असतो आणि मानसिक आणि शारीरिक विकारांनी ग्रस्त असते. या मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच वाढवणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात. अनन्या आणि विघ्नेशचे जे पालक आपल्या मुलांची परिस्थिती बघून नेहमी हताश होत होते. ते सर्वजण अनन्याच्या लग्नाच्या दिवशी नाचत होते. हा सोहळा पाहून त्यांना नवी ऊर्जा तर मिळाली होती. त्याचबरोबर प्रत्येक जण आपण आज देव विवाह पाहिला अशी भावना व्यक्त करत होते.