JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : टाकाऊ प्लास्टिकचं सोनं करण्यासाठी पुणेकरानी शोधला मार्ग, अनेकांना मिळतोय रोजगार

Pune News : टाकाऊ प्लास्टिकचं सोनं करण्यासाठी पुणेकरानी शोधला मार्ग, अनेकांना मिळतोय रोजगार

पर्यावरणासाठी हानीकारक असलेल्या टाकाऊ प्लास्टिकचं सोनं करण्याचा मार्ग शोधून काढलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 3 जुलै : प्लास्टिकचा शोध अनेक दशकांपूर्वी लोकांच्या सोयीसाठी लागला. आज तेच प्लास्टिक सर्वांसाठी काळजीचा विषय बनलंय. प्लास्टिकचा कचरा ही सर्वांसमोरची मोठी समस्या आहे. तो नष्ट होण्यासही बराच वेळ लागतो. चॉकलेट, बिस्किट, चिप्स हे खाद्यपदार्थ अनेकजण विकत घेतात. पण, ते रॅपर कुठंही फेकतात. प्लास्टिकची ही समस्या सोडवण्यासाठी पुणेकर तरुणी पुढं आलीय. तिनं या प्लास्टिकच्या कागदाचं सोनं केलंय. व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अमिता देशपांडे यांनी टाकून दिलेल्या प्लॅस्टिक रॅपर्स आणि प्लास्टिक कव्हर्सचा ढीग उचलण्याचा एक अभिनव मार्ग शोधून काढला. त्यांनी या कचऱ्यापासून वेगवेगळ्या सुंदर बॅग्स तयार केल्यात. त्यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत अमिता यांनी माहिती दिलीय.

‘मी विद्यार्थी जीवनातच डिस्पोजेबल किंवा सिंगल यूज प्लास्टिक वापरणे बंद केले होते. प्लास्टिक कचरा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत फक्त बोलणे पुरेसं नाही. मला काहीतरी करायतं होतं. मी आता आयटी कंपनीत 4 वर्ष काम केलं. त्यानंतर प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा यासाठी अमेरिकेतील पड्यू विद्यापीठात जाऊन अभ्यास केला.  त्यानंतर मी ही समस्या सोडवण्यावर काम सुरू केले. 2 मोठे प्रश्न ‘मी हे काम सुरू केल्यानंतर माझ्यासमोर दोन मोठ्या समस्या होत्या. या प्लास्टिक रॅपर्सपासून काय बनवावं? त्याचबरोबर हे रॅपर्स कुठून गोळा करायचे हे दोन प्रश्न होते. मी या रॅपरपासून साईड बॅग, लॅपटॉप बॅग, सूटकेस, कुशन कव्हर बनवण्याचं ठरवलं. याबाबत इंटरनेटवर संशोधन करून आणखी अभ्यास केला. लॅपटॉप अगदी कमी किंमतीत, पुण्यात या ठिकाणी खास ॲाफर…PHOTOS हे रॅपर्स कुठून गोळा करायचे? हा माझ्यासमोर प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी मी भंगार विक्रेत्यांशी बोलल. त्यांना प्लास्टिक कचरा गोळा करून सायकलिंगसाठी मला आणून देण्यासाठी पटवून सांगितलं. आम्ही ही उत्पादनं तयार करण्यासाठी कोणतेही मोठं तंत्रज्ञान वापरत नाही. चरखा आणि हातमागा या साधनांचा वापर करतो. या माध्यमातून गावकरी, आदिवासी यांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेचं नावही रिचचरखा ठेवलंय,’ असं अमिता यांनी स्पष्ट केलं. कसा होतो वापर? ‘सर्वप्रथम आम्ही रॅग पिकर्स आणि भंगार विक्रेत्यांकडून प्लास्टिक कचरा गोळा करतो.  ते चांगले धुवून स्वच्छ कोरडे करतो. चरखा आणि हातमागाच्या मदतीनं हे सर्व स्टिच आणि डिझाईन करतो. त्यानंतर त्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. लोकांनी प्लास्टिकचा वापर कमी केला तरच पर्यावरणाची ही मोठी समस्या दूर होईल,’ असं अमिता यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या