Pune lockdown : पुण्यात 12 तासांचा Night curfew लागू करण्यात आला आहे.
पुण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दररोज नवे कोरोना रुग्ण उच्चांक गाठत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पुण्यात 12 तासांचा नाइट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. फक्त मर्यादित लोकांसह अंत्यविधी आणि विवाहसोहळे होतील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत 20 आणि लग्नासाठी जास्तीत जास्त 50 लोकं उपस्थित राहू शकतील.
हे नवे नियम 03 एप्रिल, 2021 पासून लागू होतील, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
आठवडाभरानंतर म्हणजे 9 एप्रिल, 2021 ला परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.