JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली आहे.

जाहिरात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 23 जुलै : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या आहेत, तर पुण्याला जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रस्त्यावर पडलेले दगड हटवण्यासाठी जेसीबी आणि ट्रक घटनास्थळी दाखल झाले आहेत, पण पावसामुळे दरड हटवण्यामध्ये व्यत्यय येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या