JOIN US
मराठी बातम्या / पुणे / थेट दिल्लीतून सूत्र हलली, अन् दाभेकरांनी माघार घेतली, कसब्यात पडद्यामागे मोठ्या घडामोडी!

थेट दिल्लीतून सूत्र हलली, अन् दाभेकरांनी माघार घेतली, कसब्यात पडद्यामागे मोठ्या घडामोडी!

कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 फेब्रुवारी : कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठींकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या दाभेकर यांनी काँग्रेसकडे आपली उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती, पण ते अपक्ष लढण्यावर ठाम होते. काल रात्री काँग्रसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने दाभेकर यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गेल्या 40 वर्षापासून पक्षासाठी काम करत आहे आणि जेव्हा आम्ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती, तेव्हा मला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मी पक्षाच्या अंतर्गत गटबाजी मुळे बंड पुकारलं होतं, पण एका कार्यकर्त्याला जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो, ही खूप गर्वाची बाब आहे, म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे, असं दाभेकर म्हणाले. बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आणि महाविकासआघाडीला दिलासा मिळाला आहे. पण या माघारीने भाजपला काहीही फरक पडणार नाही. कसब्यामध्ये भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या