JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / माहेरघरीचं झाला विद्येचा अपमान; जागेच्या वादात शाळा आली रस्त्यावर

माहेरघरीचं झाला विद्येचा अपमान; जागेच्या वादात शाळा आली रस्त्यावर

जेथे देश-परदेशातून मुलं शिकायला येतात, त्या पुणे जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

0105

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातच झेडपीची शाळा निराधार झाल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यातील भोयणी गावात घडला आहे.

जाहिरात
0205

येथे झेडपी शाळेच्या जागेच्या मालकाने भर पावसात शाळेचं सर्व सामान बाहेर फेकून दिलं आहे. तानाजी सखाराम शेडगे यांच्या बाजुने कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याने शाळा खोल्यांचा ताबा घेत शाळेतील सर्व शालेय साहित्य बाहेर फेकूून दिलं आहे.1995 पासून ही शाळा भरत आहे.

जाहिरात
0305

1995 पासून ही शाळा भरत आहे. कोरोनाच्या संकटाबरोबरच मुलांसमोर आणखी नवं संकट उभं ठाकलं आहे.

जाहिरात
0405

विशेष म्हणजे ही शाळा झेडपीनं बांधली होती. पण जागेचं बक्षीसपत्र त्यावेळी करून न घेतल्याने झेडपीवर हा प्रसंग ओढवला आहे. गावकऱ्यांनी जागा मालकाला इतरत्र सोय होईपर्यंत शाळा तिथं भरू देण्याची विनंतीही केली होती पण त्यानं अतिशय असंवेदनशील पणे शाळेचं साहित्य उघड्यावर टाकून दिलं.

जाहिरात
0505

या दोन शिक्षकी झे़डपी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत पालकांच्या संमतीने वर्ग भरत होते. पण जागेच्या वादातून ही शाळा आता उघड्यावर आली आहे. ग्राम पंचायती पकडून आता दुसऱ्या इमारतीचा शोध सुरू आहे. पण झाल्या प्रकारामुळे तिथं शिकणाऱ्या चिमुरड्यांना निश्चितच मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या