JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / लग्नाच्या दिवशी जोडप्याचा मोठा निर्णय, पहिलं मूल देशासाठी

लग्नाच्या दिवशी जोडप्याचा मोठा निर्णय, पहिलं मूल देशासाठी

पिपंरी चिंचवडहून प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा स्पेशल रिपोर्ट

0108

'आम्हाला होणार पहिलं मूल आम्ही देशासाठी अर्पण करू', हे वचन लग्नमाळ गळ्यात पडताच बोहल्यावरूनच या जोडप्याने एकमेकांना दिलं आहे.

जाहिरात
0208

या तरुण नव-दांपत्याने केलेली ही घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

जाहिरात
0308

पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात राहणारा उच्च शिक्षित तरुण संकेश सुंबे प्रियेसी आरती चोधरीसोबत विवाह बंधनात अडकला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघांनी मागच्या आठवड्यात  झालेल्या  valentine day ला  विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच संध्याकाळी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताने 42 जवान गमावले.

जाहिरात
0408

वारंवार होणाऱ्या अश्या हल्ल्यांमुळे आपल्या मुलांना लष्करात भरती करायचं की नाही? या प्रश्नानं देशातील अनेक पालकांची चिंता वाढवली. त्याला अपवाद ठरत या जोडप्यानं हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0508

संकेश आणि आरतीने त्यांना होणारं पहिलं आपत्य देशसेवेसाठी अर्पण करणार असल्याचं ठरवलं आहे.

जाहिरात
0608

विशेष म्हणजे मंडपात हे सांगताच वऱ्हाडी मंडळी आणि नातेवाईकांनी "भारत माता की जय" असा जय घोष करत या नव दांपत्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

जाहिरात
0708

त्याचबरोबर शहीदांना श्रद्धांजली म्हणून सभा मंडपातच दोन मिनटं मौन पाळण्यात आला.

जाहिरात
0808

लग्न सोहळ्याच्या ठिकाणी घडलेला हा प्रकार अनेकांना अचंबित करणारा होता. मात्र संकेश आणि त्याच्या पत्नीने घेतलेला निर्णय स्तुत्य आणि देशाभिमान बाळगणारा म्हणावा लागेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या