JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मोठी बातमी! पुण्यात होता स्फोट घडवण्याचा कट, आणखी एका दहशतवाद्याला अटक

मोठी बातमी! पुण्यात होता स्फोट घडवण्याचा कट, आणखी एका दहशतवाद्याला अटक

पुण्यात याआधी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय करणाऱ्याला अटक केली आहे. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे.

जाहिरात

पुण्यात स्फोट घडवण्याचा कट, आणखी एका दहशतवाद्याला अटक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनवणे, पुणे, 26 जुलै : पुण्यात स्फोट करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने एका आरोपीला गोंदियातून अटक केली आहे. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला समजली होती. Nashik News : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना घडवली अद्दल, पावसात काढली धिंड पाहा VIDEO कोथरूड पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत आठ दिवसांपूर्वी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) यांना गाडी चोरताना अटक केली होती. त्यांच्या कडे अधिक तपास केल्यांवर हे दोघे वॅांटेड दहशतवादी असल्याच तपासात समोर आल होते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लॅपटॅाप चार फोन एक टॅब्लेट काही पेनड्राईव्ह तपासात जप्त करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांकडून हा तपास एटीएसला वर्ग केल्यानंतर या तपासात काही धक्कादायक खुलासे झालेत. तसा तब्बल ४२९ पानाचा रिपोर्ट एटीएस ने कोठडी वाढवून मागताना न्यायालयात सादर केलाय .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या