विवाह समारंभात अक्षदा पडण्याच्या अगोदर वर आणि वधू दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. या अनोख्या विवाह समारंभाची आज बारामतीत सर्वत्र चर्चा रंगली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 62 वा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी उत्साहात साजरा केला. अशाच एका समर्थकाचं गुरुवारी लग्न होतं. पण दादांच्या वाढदिवसाचा केक कापल्याशिवाय बोहल्यावर चढायचं नाही, असं वधुवरांनी ठरवलं.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांच्या कन्येचा हा विवाहसोहळा होता. यावेळी आपला पवार कुटुंबीयांशी असणारा जिव्हाळाच गावडेंनी या कार्यक्रमातून दाखवून दिला.
लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी अजित पवारांच्या वाढदिवसाचा केक कापून, त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा देऊन मगच वर आणि वधू बोहल्यावर चढले