JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / 'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर देतील सिंगल चार्जमध्ये जबरदस्त मायलेज; जाणून घ्या काय आहे किंमत

'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर देतील सिंगल चार्जमध्ये जबरदस्त मायलेज; जाणून घ्या काय आहे किंमत

दिवाळीमध्ये (Diwali) टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) खरेदी करण्याचा चांगला पर्याय तुमच्याकडे आहे.

0105

Ather 450X : Ather, एनर्जी स्टार्टअप अंतर्गत स्कूटर निर्माता कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर दक्षिण भारतातील बेंगळुरु आणि चेन्नई शहरात उपलब्ध आहेत. आता लवकरच कंपनी दिल्लीसह उत्तर भारतातील बड्या शहरात आपली डीलरशीप देणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला एकदा चार्ज केल्यानंतर 107 किमीपर्यंत चालवता येऊ शकते. याची किंमत 1 लाख रुपये आहे.

जाहिरात
0205

Hero Optima : हीरो इलेक्ट्रिक Optima स्कूटर भारतीय बाजारात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात तीन रंगात उपलब्ध केली आहे. फुल चार्ज करण्यासाठी 8 ते 10 तासांचा वेळ लागतो. एकदा चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 50 किमीपर्यंतचं अंतर पार करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 41770 रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

जाहिरात
0305

Okinawa Ridge : इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये हा उत्तम पर्याय मानला जातो. ओकिनावा कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याचा स्पीड 60 किमी ताशी आहे. बाजारात याची किंमत 44,990 रुपये इतकी आहे.

जाहिरात
0405

Bajaj Chetak : बजाजने आपली इलेक्ट्रिक स्कूटर चेतक यावर्षीच्या सुरुवातीला लाँच केली होती. कंपनीने या स्कूटरला रेट्रो लूक दिला आहे. सध्या ही स्कूटर देशातील काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहे. सिंगल चार्जमध्ये ही 95 किमीपर्यंतचं अंतर कापते. याची किंमत एक लाख रुपये आहे.

जाहिरात
0505

TVS iQube : टीव्हीएस iQube स्कूटर 2020 च्या सुरुवातीला लाँच केली होती. ही स्कूटर फुल चार्ज झाल्यानंतर जवळपास 75 किमीपर्यंत चालते. याचा स्पीड 78 किमी ताशी आहे असून याची किंमत 1.15 लाख रुपये आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या