मुलांना फक्त टीव्ही, मोबाइलमध्ये गुंतवून ठेवू नका. मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टीत व्यस्त ठेवा.
घरकामामध्ये मुलांची मदत घ्या. जेवण बनवणं, डस्टिंग किंवा किचनमधील इतर कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.
दररोज वेळ काढून त्यांच्यासह बाल्कनीत खेळा.
घराबाहेर जाणं शक्य नसेल तर घरातल्या घरात लपाछपी, कॅरम, लुडो, कार्ड्स असे खेळ खेळू शकता.
रात्री किंवा दिवसा त्यांना गोष्टी सांगा. शिवाय त्यांनाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी प्रेरित करा.
लॉकडाऊननंकर घराबाहेर पडण्यासाठी मुलांना आतापासूनच तयार करा.
खोकताना, शिंकताना तोंड झाकून घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात धुणं हे सर्व शिकवा.
मुलांच्या मनातील भीती दूर करा, त्यांच्यामध्ये विश्वास जागवा.