NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पोटदुखी असताना ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका; वाढेल Infection

पोटदुखी असताना ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका; वाढेल Infection

पोटदुखीमुळे कधीकधी परिस्थिती इतकी वाईट होते की डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

17

काही पदार्थ पोटासाठी अतिशय जड असतात. त्यामुळेच त्रास होतो आणि पोटदुखी होऊ शकते. आधीच पोटदुखीचा त्रास होत असेल तर, असे पदार्थ खाणं टाळायला हवं.

27

प्रोसेस्ड फूडमध्ये फायबरची मात्रा अजिबात नसते. त्यामुळे अपचनासारखे त्रास होतात. याशिवाय प्रोसेस्ड फूडमध्ये ट्रान्सफॅटची पातळी उच्च असते. त्यामुळे इफ्लामेशन वाढतं यामुळे पोट दुखी होऊ शकते.

37

सायट्रिक ऍसिड आपल्या आरोग्यासाठी चांगलं असलं तरीदेखील सायट्रिक ऍसिडमुळे पोटदुखी वाढू शकते. लिंबू, संत्र यासारख्या आंबट पदार्थांमध्ये सायट्रिक ऍसिड जास्त असतं. त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात.

47

पचन व्यवस्था चांगली करायची असेल तर, फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत असं सांगितलं जाते. मात्र, जास्त फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फायबरयुक्त पदार्थ खावेत.

57

बऱ्याच जणांना मसालेदार पदार्थ खायला आवडतं. मात्र मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होते आणि पोटदुखीचा त्रास होतो. या पदार्थांमधील मिरची आणि मसाल्यांमुळे आपल्याला लूज मोशनचाही त्रास होऊ शकतो.

67

कॅफिन हा आम्लीय पदार्थ आहे. ज्यामुळे पचन व्यवस्थेवर प्रभाव पडतो. यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो याशिवाय मळमळणे, पोटदुखी आणि लूज मोशनचा त्रास होऊ शकतो.

77

पोटदुखी असताना मद्यपान करू नये किंवा कोल्ड्रींक पिऊ नये. त्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात ऍसिड तयार होतं. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटदुखी, उलटी आणि लूजमोश्न यासारखे त्रास मद्यपान किंवा कोल्ड्रिंक घेतल्यामुळे होऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :