मराठी टेलिव्हिजनचं या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलं असून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका टीआरपी लिस्टमध्ये कोणत्या स्थानवर आहेत याविषयीची उत्सुकता संपली आहे.
या आठवड्याच्या TRP लिस्टमध्ये पाचव्या स्थानावर झी मराठीची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. पोलिस झालेल्या राणादा समोर सध्या मुलांना किडनॅप करणाऱ्या टोळीचा माग काढताना दिसत आहे.
झी टिव्ही वरील ऐतिहासिक मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या आठवड्याच्या टीआरपी मिटरमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
सर्वांना खळखळून हसवणारा रिअलिटी शो 'चला हवा येऊ द्या'नं TRP लिस्टमध्ये आपलं स्थान काय राखलं आहे. हा कार्यक्रम तिसऱ्या स्थानावर आहे.
काही काळापूर्वी सुरू झालेली मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'नं जोरदार मुसांडी मारली असून या मालिकेनं टीआरपी लिस्टमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको पहिल्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सौमित्र आणि राधिकाचं लग्न होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली आहे.
या लिस्टमध्ये पुन्हा झी मराठीच्या मालिकांनी बाजी मारली आहे. टॉप 5 मध्ये सर्व मालिका या झी मराठीच्या आहेत.