NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘लहान कपड्यांमुळं स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं’; गायिकेनं सांगितला अनुभव

‘लहान कपड्यांमुळं स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं’; गायिकेनं सांगितला अनुभव

कपड्यांच्या लांबीवरुन स्वप्नांची उंची ठरवू नका; Ripped jeans वादावर गायिका संतापली

110

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Neha Bhasin/Instagram)

210

“या महिला फाटके कपडे घालून का फिरतात? हे कसले संस्कार?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा भसीन हिनं संताप व्यक्त केला आहे. (Neha Bhasin/Instagram)

310

तिला देखील एकदा लहान कपडे घातल्यामुळं लाईव्ह शोदरम्यान स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं होतं, असा धक्कादायक अनुभव तिनं सांगितला. (Neha Bhasin/Instagram)

410

नेहानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “स्त्रियांना अद्याप हवं तसं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आजही समाजातील पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करते.” (Neha Bhasin/Instagram)

510

“मला देखील अनेकदा माझ्या पेहरावारुन ट्रोल करण्यात आलं आहे. एकदा तर मला लाईव्ह शोदरम्यान लहान कपडे घातल्यामुळं स्टेजवरुन खाली उतरवण्यात आलं होतं.” (Neha Bhasin/Instagram)

610

“आयोजकांनीच माझा अपमान केला होता. परंतु तो अपमान मी पचवला आज मी तेच करते जे मला कारयचं आहे.” (Neha Bhasin/Instagram)

710

“तीरथ सिंह रावत यांच्यासारखी मंडळींना मी एकच सांगेन कपड्यांच्या लांबीवरुन आमच्या ध्येयाचा अंदाज लावू नका” अशी संतप्त प्रतिक्रिया तिनं दिली. (Neha Bhasin/Instagram)

810

अभिनेता सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटातील 'जग घुमेया' या गाण्यामुळं नेहा भसीन खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. (Neha Bhasin/Instagram)

910

'धुनकी लागे', 'कुछ खास है', 'स्वैग से स्वागत', 'हिरीये' यांसारखी अनेक गाणी गायली आहेत. (Neha Bhasin/Instagram)

1010

शिवाय तिला दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. (Neha Bhasin/Instagram)

  • FIRST PUBLISHED :