आवडत्या व्यक्तीसोबत केलं लग्न पण टिकला नाही संसार; या अभिनेत्रींनी काही वर्षातच घेतला घटस्फोट
मराठी मनोरंजन सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांची अभिनय कारकीर्द तर खुपचं यशस्वी ठरली. मात्र त्यांचं खाजगी आयुष्य खुपचं खडतर. करण या अभिनेत्रींनी लग्न तर केलं. मात्र काही वर्षांतचं घटस्फोट सुद्धा झाला. जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल...
अभिनेत्री अभिज्ञा भावे, तिने अनेक मालिकांमधून आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिचा पाहिलं लग्न वरुण वैतीकर सोबत झालं होतं. मात्र या दोघांनी घटस्फोट घेतला होता. नुकताच अभिज्ञाने मेहुल पाई सोबत दुसर लग्न केल आहे.
मराठीतील बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हनकरचा सुद्धा यात समावेश होतो. सईचं लग्न अमेय गोसावी याच्यासोबत झालं होत. मात्र काही काळातच यांचा घटस्फोट झाला होता.
'रुंझी' फेम अभिमेत्री पल्लवी पाटीलचं लग्नं अभिनेता संग्राम समेळसोबत झालं होतं. मात्र काही काळातचं या दोघांनी घटस्फोट घेतला होता.
अभिनेत्री रेशम टिपणीस यांचं लग्न अभिनेता संजीव सेठ यांच्यासोबत लग्नं झालं होतं. मात्र काही वर्षातचं हे दोघे विभक्त झाले होते.
अभिनेत्री तेजश्री प्रधानचं लग्न अभिनेता शशांक केतकर सोबत झालं होतं. मात्र 1..2 वर्षातचं या दोघांचा घटस्फोट झाला होता.
अभिनेत्री स्मिता गोंदकरचं लग्न सिद्धार्थ बंडीयासोबत झालं होतं. मात्र या दोघांनीही घटस्फोट घेतला आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेचं लग्न मिलिंद शिंदे सोबत झालं होतं. मात्र या दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. रुपाली सध्या अंकित मगरेला डेट करत आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा सुद्धा यात समावेश होतो. याचं लग्न आनंद नाडकर्णी यांच्यासोबत झालं होतं. मात्र हेसुद्धा विभक्त झाले आहेत.