JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'जर अनुष्का भेटली नसती तर..' विराट कोहलीने पत्नीप्रती व्यक्त केल्या भावना

'जर अनुष्का भेटली नसती तर..' विराट कोहलीने पत्नीप्रती व्यक्त केल्या भावना

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये पत्नी अनुष्का शर्माचं कौतुक करत असतो. विराट आपल्या यशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माचादेखील मोठा वाटा असल्याचं मान्य करतो.

0106

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये पत्नी अनुष्का शर्माचं कौतुक करत असतो. विराट आपल्या यशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माचादेखील मोठा वाटा असल्याचं मान्य करतो.

जाहिरात
0206

इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सिरीज सुरु होण्याआधी, विराटने पुन्हा एकदा पत्नी अनुष्का शर्माची स्तुती केली आहे. दिनेश कार्तिकसोबत स्काय स्पोर्ट्सवर बोलत असताना विराट कोहलीने म्हटलं आहे, 'मी खूपच नशीबवान आहे. कारण मला अनुष्कासारखी जोडीदार मिळाली आहे.

जाहिरात
0306

तसेच विराटने म्हटलं, 'मी जर अनुष्काला भेटलो नसतो, तर माहिती नाही मी कुठे असतो. मी आज जो आहे,किंवा जे करत आहे. त्याच्या माध्यमातून माझा काय प्रभाव पडू शकतो, हेसर्व मला अनुष्काने समजावलं होतं. एक व्यक्ती म्हणून अनुष्काने माझ्यामध्ये स्थिरता आणली आहे.आणि याचा फायदा मला क्रिकेटमध्येसुद्धा झाला आहे. तिच्यासारखी जोडीदार मिळाल्याने मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो.

जाहिरात
0406

तसेच मुलगी वामिकाबद्दल बोलताना विराटने म्हटला हे, 'आम्हा दोघांसाठी आत्ता वामिका सर्वात आधी आहे. तिला झोपवल्याशिवाय आम्ही काहीही करत नाही. आधी तिला व्यवस्थित झोपवून मग मिळालेल्या वेळेत आम्ही कॉफी घेणे किंवा ब्रेकफास्ट घेणे यांसारखी कामे करतो. वामिकाला जास्तीत जास्त वेळ देणं सध्या हेचं आमचं काम आहे.

जाहिरात
0506

बीसीसीआयने सर्व खेळाडूं त्यांच्या कुटुंबांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनुष्का आणि वामिक विराटसोबतचं युकेच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांनी मोकळ्या वेळेमध्ये आपले खास फोटोसुद्धा शेयर केले आहेत.

जाहिरात
0606

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 मॅचच्या सिरीजचा दुसरा टेस्ट मॅच 12 ऑगस्टपासून खेळण्यात येणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या