बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोमवारी विमानतळावर दिसली. जिथे तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पांढऱ्या रंगाच्या सॉक्समध्ये ओव्हरसाईज ब्लू प्रिंटेड डेनिम जॅकेट आणि हलक्या निळ्या हील्समध्ये दिसली. दीपिकाचे हे फोटो समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या फॅशन सेन्सवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. दीपिकाचे डेनिम जॅकेट लोकांना फारसे आवडले नाही. पण त्याची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल.
दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक खूपच कॅज्युअल आहे. जो चाहत्यांना खूप आवडतो. मात्र यावेळी सोशल मीडिया यूजर्सना अभिनेत्रीची फॅशन चॉईस फारशी आवडली नाही.
दीपिका पदुकोण अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी नेहमीच तिच्या फॅशनेबल लुकसाठी ओळखली जाते. पण यावेळी दीपिकाचे ओव्हरसाईज डेनिम जॅकेट आणि त्यासोबत घातलेले पांढरे मोजे यांचे कॉम्बिनेशन पाहून सोशल मीडिया यूजर्स तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
दीपिका पदुकोणचे डेनिम जॅकेट लोकांना आवडणार नाही, पण या जॅकेटची किंमत जाणून तुम्हाला हिवाळ्यात नक्कीच घाम फुटेल.
दीपिका पदुकोणच्या या डेनिम जॅकेटची किंमत ५९,५०० युरो आहे. म्हणजेच एका फॅशन साइटनुसार, त्याची किंमत भारतीय रुपये 50 लाख, 44 हजार, 112 रुपये आहे.
दीपिका पदुकोणचा पती आणि चित्रपट अभिनेता रणवीर सिंगला नेहमी अतरंगी कपडे घालण्यासाठी ट्रोल केले जाते. पण दीपिकाच्या या डेनिम आणि सॉक्सबद्दल रणवीरचा इफेक्ट दीपिकावर झाल्याचे बोलले जात आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा '83' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात दीपिका पदुकोणने प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारली आहे.