NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi च्या घरात पडले दोन ग्रुप; 'सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने?' 

Bigg Boss Marathi च्या घरात पडले दोन ग्रुप; 'सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने?' 

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरामध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे हे कळवणं म्हणजे जरा कठीणच असतं. कोणता सदस्य कोणाच्या बाजूने वा कोणत्या ग्रुपला जॉइन होईल हे सांगता येत नाही. पाहा Bigg Boss Marathi Latest Update

112

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे हे कळण म्हणजे जरा कठीणच असतं. कोणता सदस्य कोणाच्या बाजूने वा कोणत्या ग्रुपला जॉइन होईल हे सांगता येत नाही. हे मात्र खरं की, आपण ज्यावर जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ति कधी तुमच्या विरोधात जाईल हे कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सदस्यांना खूप सतर्क राहावं लागतं. 

212

शिवलीला, विकास आणि मीनल यांची चर्चा आज चांगलीच रंगणार आहे. मीनलच्या मनातला प्रश्न ती आज शिवलीला आणि विकास समोर मांडताना दिसणार आहे.

312

सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने आहेत ? हेच कळत नाहीये. एवढं त्यांना तोंडावर सांगितलं तरीपण त्यांच्याशी गुलूगुलू बोलत आहेत. ते जर कळलं तर आपल्याकडे त्यांना फिरवायला. यांचं संभाषण ऐकून हा प्रश्न नक्कीच पडू शकतो की, घरामध्ये दोन ग्रुप तर नाही ना तयार होत आहेत ? वा बनले आहेत ?

412

शिवलीलादेखील त्यांची strategy मांडताना दिसणार आहेत. त्या म्हणाल्या, “मोठी strategy ही आहे, की आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या ग्रुपमधले सदस्य कमी केले पाहिजे. हीच सगळ्यात मोठी strategy आहे.

512

कोण आणि कसं कमी करायचं ते ठीक आहे ते नंतर बघता येईल. सगळयात महत्वाचा मुद्दा काय, पुढची माणसं आहेत ना आधी ती धडाधडा पाडा आणि पाडताना विचार करा जो पडणार नाही त्याला पाडू नका, जो कडेवर उभा आहे त्याला पाडा.

612

काही काही लोकं अशी आहेत जो दोन्ही नावेत पाय टाकून प्रवास करत आहेत. त्यांना पण कळू देत की ही माणसं कशी आहेत ते.”

712

आता ती लोकं म्हणजे कोणती ? कुठला ग्रुप ? नक्की कोणाबद्दल हे बोलत आहेत ? जाणून घ्या आजच्या भागामध्ये.

812

घरात गायत्री आणि मीराची देखील चांगली मैत्री झाल्याचे दिसत आहे. नेहमी दोघी एकत्र दिसत असतात.

912

नेमके घरात कुणाचे कुणाचे ग्रुप पडलेत आणि हे ग्रुप किती दिवस टिकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

1012

घरात सध्या जोडीच्या टास्कने देखील रंगत आणली आहे. सोशल मीडियावर हा टास्क चर्चेत आहे.

1112

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत असतात. आज जो मित्र असतो तो उद्या शत्रू देखील अशू शकतो..हीच तर या घऱाची खाशीयत आहे.

1212

त्यामुळे या घऱात दररोज नवीन ग्रुप बनतो आणि मोडतो देखील. मात्र ग्रुप तर या घऱात होतातच.

  • FIRST PUBLISHED :