अभिनेता ललित प्रभाकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो.
ललित नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असतो. नुकताच त्यानं एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यानं काळ्या रंगाची कपडे घातली आहे.
ललितनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काळ्या रंगाच्या शर्टमध्ये त्यानं हा फोटो शेअर केला असून त्याच्या कॅप्शननंही सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
शेअर केलेल्या फोटोला ललितनं भन्नाट कॅप्शन दिलं आहे. 'तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी नेहमीच काळ्या रंगाचे कपडे का घालतो', असं ललितनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हजारो तरुणींचा क्रश असलेला अभिनेता ललित प्रभाकर नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.
ललितनं आपल्या अभिनयाच्या जोरादवर एक वेगळा असा चाहता वर्ग बनवला आहे.
ललित प्रभाकरनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
ललितच्या हटके भूमिका आणि अभिनय कौशल्यानं त्यानं चाहत्यांच्या मनात आपलं घर बनवलं आहे.
ललितच्या नवनवीन फोटोंना चाहते नेहमीच पसंती दर्शवतात आणि त्याचं कौतुक करतात.
ललितच्या फोटोंवर चाहते नेहमीच कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.