चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ( 67th National Films Awards )घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती.
आज या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले.
यावेळी रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले.
सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
बॉलीवू़ड अभिनेत्री कंगना राणवतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'रान पेटले' या गाण्यासाठी सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेता मनोज तिवारीला ‘भोसले’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
बॉलीवू़ड अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेता धनुषला ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (फोटो साभार : ANI ट्वीटर)