भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना लॉकडाऊन शिथील करण्यात आला. त्यानंतर कशी परिस्थिती आहे ते पाहुयात.
बहुतेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणं, सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र कोरोनाव्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांना मास्क घालणं बंधनकारक आहे. शिवाय मॉल, मोठी दुकानं, फूड मार्केटमध्ये जाण्याआधी शरीराचं तापमान तपासलं जातं. हे दृश्यं आहे ते इटलीतील. जिथं फूड मार्केटच्या प्रवेशद्वारावर लोकं विशिष्ट अंतर ठेवून उभे आहेत. प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्यांना आत सोडलं जातं. (फोटो - रॉयटर्स)
लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्ती दुरावल्या. कपल एकमेकांपासून दूर गेले, मित्रमैत्रिणी दूर झाले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बहुतेकांनी सर्वात आधी आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींची भेट घेतली. स्पेनमधील एल्डरी केअर सेंटरमधील हे दृश्यं आहे. तब्बल 102 दिवसांनी या ठिकाणच्या वृद्धांना आपल्या प्रिय व्यक्तींना भेटता येतं आहे. या फोटोमध्ये पती-पत्नी एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. लग्नाच्या 59 वर्षांनंतर ते असे कधीच वेगळे झाले नव्हते. मात्र तशी वेळ आली आणि त्यांना वेगळं व्हावं लागलं. यानंतर ते भेटले मात्र त्यावेळीदेखील कोरोनाचा धोका नको म्हणून त्यांनी आवश्यक ती काळजी घेतली आहे. (फोटो - एपी)
लॉकडाऊनमध्ये आणखी एक समस्या होती ते म्हणजे वाढलेल्या दाढी-केसांचं काय करायचं? त्या परिस्थितीत अनेकांनी घरच्या घरीच आपल्या हातात कात्री घेऊन एक्सपिरेमेंट्स केलं. मात्र जसे सलून खुले झाले तेव्हा सर्वजण तिथे पळाले. मात्र सलूनमध्येही कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. हे पॅरिसमधील बार्बर शॉप आहे. जिथं बार्बरने मास्क घातला आहे त्याशिवाय चेहऱ्यावर प्रोटेक्टिव्ह शीटही लावली आहे आणि हातात ग्लोव्हज घातले आहेत. (फोटो - रॉयटर्स)
असंच काहीसं चित्र ब्युटीपार्लरमध्येही आहे. आपल्या सौंदर्याची अधिक काळजी घेणाऱ्या महिलांना तर लॉकडाऊन कधी संपतो आणि मी कधी पार्लरमध्ये जाते असं झालं होतं. हे चित्र भारतातील आहे. ज्याध्ये मास्क, ग्लोव्हज, प्रोटेक्टिव्ह सूट अशी पूर्णपणे खबरदारी घेतली जाते आहे.
हे चित्र स्वित्झर्लंंडमधील आहे. जिथं पोडियाट्रिस्टनेही मास्क घातल्याचं दिसतं आहे. हे स्वित्झर्लंडमधील तारा वेल वेलनेस सेंटर आहे. (फोटो - रॉयटर्स)
कोरोनाचा जास्त धोका हा डेन्टटिस्ट आहे. रुग्णांच्या थेट तोंडाशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे डेटिन्स्टही आवश्यक ती खबरदारी घेऊन रुग्ण हाताळत आहेत. स्वित्झर्लंडमधील डेन्टटिस्ट लिओनार्ड ब्राझोलो रुग्णावर उपचार करताना. (फोटो - रॉयटर्स)
काही देशांनी रेस्टॉरंट्ही खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र अनेक रेस्टॉरंट्स फूड पॅक करून देत आहेत. इटलीतील रेस्टॉरंट मालक एका ग्राहकाला फूड पॅक करून देत आहेत. मात्र त्यावेळी विक्रेता आणि ग्राहक दोघांनीही आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मास्त, ग्लोव्हज घातले आहे. (फोटो - रॉयटर्स)
पबमध्येही अशीच काळजी घेतली जाते आहे. युरोपच्या चेक रिपब्लिक देशातील हा पब आहे. जिथं पब मॅनेजर हातात ग्लोव्हज घालून बिअरचा ग्लास भरताना दिसतो आहे. (फोटो - रॉयटर्स)
तर दुसरीकडे जर्मनीत फ्रँक फ्राइडल यांनी आपलं दुकान खुलं आहे आणि ते ग्राहकांची प्रतीक्षा करत आहेत. (फोटो - रॉयटर्स)
युरोपमधील सर्वात मोठी कार फॅक्टरी Volkswagen पुन्हा सुरू झाली. ही फॅक्टरी जर्मनीत आहे. तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही मास्क आणि हँड ग्लोव्हज घातल्याचं दिसतं आहे. (फोटो - रॉयटर्स)
चीनमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्यात. चोंगक्विंगमधील ही शाळा आहे, जिथं मुलं मास्क घालून बसली शिवाय प्रत्येकाच्या डेस्कवर एक पारदर्शक बॉक्सही लावण्यात आला आहे. (फोटो - रॉयटर्स)