JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / जगभरात 6 कोरोना लशी ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात; कोणती ठरेल यशस्वी? WHO ने दिली माहिती

जगभरात 6 कोरोना लशी ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात; कोणती ठरेल यशस्वी? WHO ने दिली माहिती

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर (corona vaccine) काम सुरू आहे.

0108

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 7 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत तर 80 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे.

जाहिरात
0208

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

जाहिरात
0308

तिसऱ्या टप्प्यात व्यापक स्तरावर ट्रायल केलं जातं. मोठ्या संख्येनं लोक या ट्रायलमध्ये सहभागी होतात. लशीचा परिणाम किती आहे आणि किती लोकांवर ती काम करत आहे, याची माहिती या टप्प्यात मिळते.

जाहिरात
0408

सहापैकी तीन लशी या चीनच्या आहेत. सिनोवॅक, वुहान इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट आणि सिनोफॅरम/बीजिंग इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट.

जाहिरात
0508

अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या कोरोना लशीच्या पहिल्या दोन टप्प्याचे परिणाम चांगले आले आहेत. 27 जुलैपासून तिसरा टप्पा सुरू झाला आहे.

जाहिरात
0608

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. या लशीचे वेगवेगळ्या देशात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युटही या लशीसंदर्भात भागीदार आहे.

जाहिरात
0708

भारताच्या भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला या कंपनीच्या कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालेलं आहे. भारत बायोटेकने याआधी पोलिओ, रेबीज, चिकनगुनिया, जापानी इनसेफ्लाइटिस, रोटा व्हायरस आणि झिका व्हायरसवरील लसही तयार केली आहे.

जाहिरात
0808

जगभरातील या सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या असतील तर त्या यशस्वी ठरतील याची शाश्वती देता येत नाही, असंही WHO ने स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या