हा WhatsApp Group मला कायमचाच म्युट करता आला असता तर, तुमच्या मनातील हा विचार लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
आपल्या मोबाइलमध्ये आपले एक ना दोन किती तरी WhatsApp Group असतात आणि दिवसभर त्यावर मेसेज येत असतात. गरजेच्या नसलेल्या ग्रुपवरील नोटिफिकेशन आपण काही कालावधीसाठी म्युट करून ठेवतो.
सध्या आठ दिवस, एक आठवडा आणि एक वर्ष ग्रुप म्युट करण्याचा पर्याय WhatsApp Group वर आहे. मात्र कधी कधी कायमचाच हा ग्रुप आपल्याला म्युट करता आला असता तर असा विचार अनेकांच्या मनात येतो.
WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp चं नवं बिटा फिचर लवकरच येणार आहे. या नव्या फिचरचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये म्युट ऑप्शनमध्ये always असाही पर्याय आहे.
जोपर्यंत ग्रुप म्युटवर आहे तोपर्यंत आपल्याला त्या ग्रुपचे नोटिफिकेशन येणार नाहीत. जेव्हा आपण ग्रुप अनम्युट करतो तेव्हाच आपल्याला नोटिफिकेशन येतात. असंच या नव्या फिचरमध्येदेखील असेल.