JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / ब्योमकेश बक्शी ते दिल बेचारा; फिल्मी प्रवासातील दमदार भूमिकांसह सुशांतचे हटके लुक्स

ब्योमकेश बक्शी ते दिल बेचारा; फिल्मी प्रवासातील दमदार भूमिकांसह सुशांतचे हटके लुक्स

दमदार अभिनयासह या खास लूक्समध्येही सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) कायम प्रत्येकाच्या आठवणीत कायम राहिल.

0106

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 'दिल बेचारा'प्रमाणेच याआधीच्या चित्रपटातही दमदार भूमिका केल्या आहेत. मात्र त्याच्या या भूमिकेसह त्याच्या लूक्सनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुशांतच्या या फिल्मी प्रवासातील त्याचे हे लुक्सही कायम लक्षात राहतील.

जाहिरात
0206

2015 सालच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी' चित्रपटात सुशांत डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसला. आपल्या अंदाजासह लूकमध्येही त्याने बदल केला होता. या चित्रपटातून त्याने फक्त अभिनयाने नाही तर लुक्सनेही प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. 

जाहिरात
0306

2016 साली सुशांतने भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार राहिलेल्या महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी'मध्ये काम केलं. या चित्रपटात सुशांतने आपल्या लूकमध्ये खूप बदल केले. धोनीच्या अंदाजात लांब केस असलेला सुशांतही सर्वांना आवडला.

जाहिरात
0406

2019 साली सुशांतने तर आपल्या चित्रपटातील अवतारामुळे सर्वांना चकितच केलं. 'सोन चिरैया' फिल्ममध्ये तो डाकूच्या भूमिकेत होता आणि यासाठी त्याने फक्त आपली हेअरस्टाइलच बदलली नाही तर तशी बॉडी बनवण्यासाठीही खूप मेहनत घेतली.

जाहिरात
0506

2019 मध्येच 'छिछोरे' चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका केल्या. कॉलेज बॉयसह त्याने वडिलांचीही भूमिका बजावली आणि या भूमिकेसाठी पूर्णपणे बदलायलाही त्याने मागेपुढे पाहिलं नाही.

जाहिरात
0606

आणि आता 2020 सुशांतची शेवटची फिल्म 'दिल बेचारा'मध्ये तो वेगळ्याच अंदाजात दिसला आणि त्याचा हा लूकही आता कायम लक्षात राहिल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या