Snowfall मुळे अटल बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बर्फ साठला आहे. हा बर्फ रस्त्यावरुन हटवाला जात आहे, एकीकडे एप्रिल महिन्यातल्या गर्मीमुळे मैदानी भागात तापमान वाढलं आहे. तर, दुसरीकडे खराब हवामानामुळे मनाली आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस सुरू आहे.
एप्रिल महिना सरत असताना देशात पारा वाढू लागलाय. तिथेच हिमाचल प्रदेशमध्ये पावसाला सुरुवात झालीये. मनाली सारख्या भागात 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे.
एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होतीय. त्यामुले थंडीचा सिझन सुरु झाल्यासारखं वाटत आहे.
बर्फवृष्टीमुळे मनालीच्या परिसरात रस्त्यांवर बर्फ साठला आहे. त्यामुळे अटल टनेलकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलीये. वाहनांना केवळ सोलंगनाला पर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलीये.
आपातकालीन स्थितीमध्येच अवजड वाहनाना सोलंगनाच्या पुढे जाण्याची परवानगी देण्यात आलीये. रस्त्यांवरील बर्फ हटवण्यात येतोय. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास बर्फ वाढणार आहे.