सध्या ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिका संपत आलीय. त्यामुळे फॅन्सना एका गोष्टीची उत्सुकता वाढलीय. समीर आणि मीराचं पॅचअप होतंय की नाही? मेनका आणि रजनीश अजूनही मीरा-समीरच्या मध्ये अडथळे आणतायत. दोघांची कटकारस्थानं चालूच आहेत. रजनीश आणि मीराच्या लग्नपत्रिकाही छापल्या गेल्यात. या लग्नासाठी मीराच्या घरचे लोक जाम उत्साहात आहेत. पण मीरा खूश नाही. तिचं अजूनही समीरवर प्रेम आहेच. पण मीराचं मन तिच्या आईलाही कळत नाहीय. या मालिकेत महत्त्वाची भूमिका रोहिणी हट्टंगडी यांची. समीरची ही आजी एकदम माॅडर्न आहे.
सध्या 'तुझं माझं ब्रेकअप' मालिका संपत आलीय. त्यामुळे फॅन्सना एका गोष्टीची उत्सुकता वाढलीय. समीर आणि मीराचं पॅचअप होतंय की नाही?
या मालिकेत महत्त्वाची भूमिका रोहिणी हट्टंगडी यांची. समीरची ही आजी एकदम माॅडर्न आहे. पण तितकीच प्रेमळ. मीरा आणि समीरनं एकत्र यावं यासाठी तीही खूप प्रयत्न करतेय.
समीरच्या आईनंच खरं तर या दोघांचा घटस्फोट घडवून आणला होता. पण आता तिलाच पश्चात्ताप होतोय आणि समीर-मीराला एकत्र आणण्यात आता तिचाही वाटा असणार आहे, हे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईझ असेल.
लग्न अगदी उद्यावर ठेपलं असताना समीर मीराला भेटायला जातो. तिच्या घरातल्यांच्या विरोधानंतरही समीर मीराला भेटतो. पण लग्नाची सगळी तयारी झाली असताना मीरा संभ्रमात पडते.
मीरा समीरची होणार की रजनीशची? हाच मोठा सस्पेन्स. खरं तर ही मालिका अशा मोडवर थांबतेय की त्याचा दुसरा भाग होऊ शकतो. मीराच्या एका निर्णयावरच आता सर्व काही अवलंबून आहे.