JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / Birthday Special : ...म्हणून संजय दत्तला त्रिशालाचा ताबा मिळाला नव्हता

Birthday Special : ...म्हणून संजय दत्तला त्रिशालाचा ताबा मिळाला नव्हता

आज संजय दत्तचा वाढदिवस. त्याचा जन्म 1959चा. संजय दत्त आणि नर्गिसच्या या मुलाचं आयुष्य म्हणजे खुलं पुस्तक. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातल्या काही खास गोष्टी. जॅकी श्राॅफच्या हिरो सिनेमात संजय दत्तला घेणार होते. पण सुभाष घई आणि त्याचा वाद झाल्यानं संजयच्या जागी जॅकी श्राॅफला घेतलं. हे तर सगळ्यांना ठाऊक आहे, संजय दत्तच्या करियरची सुरुवात राॅकी सिनेमातून झाली होती. पण रेश्मा और शेरा सिनेमातून त्यानं पहिल्यांदा बालकलाकार म्हणून भूमिका केली, हे फार कमी जणांना माहीत आहे.

019

आज संजय दत्तचा वाढदिवस. त्याचा जन्म 1959चा. संजय दत्त आणि नर्गिसच्या या मुलाचं आयुष्य म्हणजे खुलं पुस्तक. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातल्या काही खास गोष्टी.

जाहिरात
029

जॅकी श्राॅफच्या हिरो सिनेमात संजय दत्तला घेणार होते. पण सुभाष घई आणि त्याचा वाद झाल्यानं संजयच्या जागी जॅकी श्राॅफला घेतलं.

जाहिरात
039

हे तर सगळ्यांना ठाऊक आहे, संजय दत्तच्या करियरची सुरुवात राॅकी सिनेमातून झाली होती. पण रेश्मा और शेरा सिनेमातून त्यानं पहिल्यांदा बालकलाकार म्हणून भूमिका केली, हे फार कमी जणांना माहीत आहे.

जाहिरात
049

संजय दत्तचा आपल्या आईशी जास्त जवळीक होती. पण दुर्दैवानं राॅकीच्या आधी तीन दिवस नर्गिसचा मृत्यू झाला. संजय दत्त खचून गेला. त्यावेळी संजय दत्तनं ड्रग्ज घेतले. त्यानंतर तो या व्यसनाच्या आधीन झाला. मग सुनील दत्त त्याला घेऊन अमेरिकेत रिहॅब सेंटरमध्ये गेले होते.

जाहिरात
059

अमेरिकेत संजय दत्तची ओळख रिचा शर्माशी झाली. दोघांनी लग्न केलं. त्यांना मुलगी झाली ती त्रिशाला.

जाहिरात
069

ब्रेन ट्युमरमुळे रिचा शर्माचा मृत्यू झाला. त्रिशालाचा ताबा मिळावा म्हणून संजूबाबा कोर्टात गेला. पण त्याची एकूण पार्श्वभूमी पाहता त्रिशालाला रिचाच्या आईवडिलांनी सांभाळावं असं कोर्टानं सांगितलं.

जाहिरात
079

संजय दत्त आणि रेखामध्ये अफेअर होतं, अशीही चर्चा होती. दोघांनी गुपचूप लग्न केलं, असंही म्हणायचे. पण नंतर हेही समोर आलं की अमिताभ-रेखाचं अफेअर लपवण्यासाठी ही बातमी पसरवलीय.

जाहिरात
089

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचंही अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण 1993च्या बाॅम्बस्फोटात संजय दत्तचं नाव आलं आणि माधुरीनं त्याच्याकडे पाठ फिरवली.

जाहिरात
099

नाम सिनेमा पाहून अमिताभ बच्चन खूश झाले. त्यांनी संजय दत्त आणि कुमार गौरवला घरी डिनरला बोलावलं आणि सोन्याची चेन संजूबाबाला गिफ्ट दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या