JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कोरोना लशीबाबत रशियाने उचललं आणखी एक मोठं पाऊल; आता इतक्या लोकांवर होणार ट्रायल

कोरोना लशीबाबत रशियाने उचललं आणखी एक मोठं पाऊल; आता इतक्या लोकांवर होणार ट्रायल

रशियाने सुरुवातीला केलेल्या ट्रायलचा अहवाल जारी केलेला नाही, त्यामुळे या कोरोना लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहे.

0106

रशियाने अगदी कमी वेळात कोरोनाची लस तयार करून संपूर्ण जगाला धक्का दिला. स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे.

जाहिरात
0206

ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना, त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला ही लस देऊन त्याच्या सुरक्षिततेची हमी देण्यात आली आणि आता रशियाने व्यापक स्तरावर लोकांना ही लस देण्यासाठी पावलं उचलली आहे.

जाहिरात
0306

रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे. इतक्या लोकांवर चाचणी करणार आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियान न्यूज एजन्सी TASS हे लशीच्या उत्पादकांनी गुरुवारी ही माहिती दिल्याचं सांगितलं.

जाहिरात
0406

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. या लशीचं दोन महिन्यातच सुरुवातीचे दोन क्लिनिकल ट्रायल करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण करण्याआधीच ही लस लाँच करण्यात आली.

जाहिरात
0506

लशीच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले.  20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिल्याचा दावा रशियाने केला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) रशियन लशीबाबत जगाला सावध केलं आहे.

जाहिरात
0606

जगातील 9 कोरोना लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र यामध्ये रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचा समावेश नाही. या लशीबाबत आपल्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित असेल हे सांगू शकत नाही, असं WHO ने म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या