रायचंद शिंदे, प्रतिनिधी: एव्हरेस्ट मोहिमेतील अंतिम टप्प्याच्या वेळी बोचरी थंडी तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मात्र वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे आव्हान सुखकर झाल्याचे जितेंद्रने सांगितले.
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील जितेंद्र गवारे या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्टचे अन्नपूर्णा - 1 मोहिमेअंतर्गत जगातलं दहावं उंच शिखर 'माऊंट अन्नपूर्णा - 1' वर यशस्वी चढाई केली.
25 दिवसांत दोन आठहजारी शिखरांवर चढाई करण्यात जितेंद्रने यश मिळवत नवा इतिहास रचला आहे. एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर आहे तर अन्नपूर्णाची 8091 मीटर आहे.
जितेंद्रने यापूर्वी 2019 मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगा वर तिरंगा फडकविला होता.
एव्हरेस्ट मोहिमेतील अंतिम टप्प्याच्या वेळी बोचरी थंडी तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मात्र वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे आव्हान सुखकर झाल्याचे जितेंद्रने सांगितले.
जितेंद्रला या दोन्ही मोहिमांसाठी गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहीमांचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे व सुमित मांदळे यांचे मार्गदर्शन लाभले.