अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) फोटो शेअर करत असं नेमकं का म्हणाली वाचा.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले, अनेकांवर टीका केली, अनेक वादग्रस्त वक्तव्यही तिनं केली. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही तिनं लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेनं तिचं ऑफिस पाडल्यानंतर तर ती अधिकच संतप्त झाली आणि तिने एकामागो एक अशा ट्वीटची मालिका सुरूच ठेवली.
बीएमसीने ऑफिस पाडल्यानंतर कंगनाने आपल्या ऑफिसचे फोटो आपल्या सोशल मीडियावर टाकले आहेत. हा बलात्कार असल्याची संतप्त प्रतिक्रिया कंगनाने ट्वीट करत दिली आहे.
कंगनाने बीएमसीविरोधात एकामागो एक असे ट्वीट केले आहेत. कंगना म्हणाली, "हा बलात्कार आहे, माझ्या स्वप्नांचा, माझ्या धैर्याचा, माझ्या आत्मसन्मानाचा आणि माझ्या भविष्याचा"
"घर बनवण्यासाठी एक आयुष्य निघून जातं आणि घरं जाळताना तुम्ही 'आह'देखील करत नाहीत. हे पाहा काय होतं आणि काय करून टाकलं आहे माझं घर. हा बलात्कार नाही का?"
"जे कधी मंदिर होतं, त्याला स्मशानभूमी बनवून टाकलं. पाहा माझ्या स्वप्नांचा कसा चुराडा केला आहे, हा बलात्कार नाही?"
कंगना रणौतचं मुंबईतील हे ऑफिस वांद्र्यातील पाली हिल रोड परिसरात आहे. ज्याची किंमत 48 कोटी रुपये आहे.
आपण या ऑफिसचं स्वप्न अकरा वर्षांपूर्वी पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात साकारल्याचं कंगनाने सांगितलं होतं.
कंगनाच्या या आलिशान ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत मुंबई पालिकेनं धडक कारवाई केली. 9 सप्टेंबरला तिच्या ऑफिसवर बुल्डोझर फिरवला.
कंगनाने मुंबईत येताच या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्त्यानंतर कोर्टाने यावर स्थगिती दिली आहे.