JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

कीटकनाशक औषधातील (insect killing drug) एक घटक कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) प्रभावी ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

0110

सध्या हँड सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, डिसइन्फेक्ट स्प्रे हे कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी वापरले जात आहेत.

जाहिरात
0210

मात्र कीटकनाशकदेखील कोरोनाव्हायरसचा नाश करू शकतो, असा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे.

जाहिरात
0310

कीटकनाशक औषधांमध्ये एक असा सक्रिय पदार्थ आहे, ज्याच्यामध्ये कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता आहे, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

जाहिरात
0410

डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीच्या (DSTL) शास्त्रज्ञांनी मोसीगार्डचा (डास मारण्याचं औषध) अभ्यास केला.

जाहिरात
0510

मोसीगार्डसारख्या कीटकनाशक औषधांमध्ये सिट्रीओडिओल हा सक्रिय पदार्थ असतो. ज्यामध्ये विषाणूविरोधी गुण असल्याचं दिसून आहे आहे.

जाहिरात
0610

सिट्रिओडिओल युकालिप्टस सिट्रिओडोरा झाडाची पानं आणि फांद्यामधून मिळतं. हा घटक किटक मारण्याच्या औषधात वापरल्या जाणाऱ्या डीट या घटकाला नैसर्गिक पदार्थ म्हणून पर्याय मानला जातो.

जाहिरात
0710

याचा वापर दोन पद्धतीने करण्यात आला. एक म्हणजे द्रव रूपात याचे थेंब थेट व्हायरसवर टाकण्यात आले आणि दुसरं म्हणजे लेटेक्सपासून तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक त्वचेवरही लावण्यात आलं.

जाहिरात
0810

दोन्ही पद्धतींमध्ये या घटकाने कोरोनाव्हायरसविरोधात प्रक्रिया केल्याचं दिसून आलं.

जाहिरात
0910

दरम्यान वारंवार हात धुणं आणि अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर वापरून कोरोनापासून बचाव करणं या उपायांव्यतिरिक्त हा स्प्रे किती सक्षम ठरेल हे  माहिती नाही. त्यामुळे यााबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.

जाहिरात
1010

मात्र सुरुवातीचे सकारात्मक परिणाम पाहून याबाबत आता अधिक संशोधन केलं जाणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या