अवघ्या 20 वर्षांचा नीलकंठ भानू प्रकाश जगातील quickest human calculator ठरला आहे.
हैदराबादच्या तेलंगणातील 20 वर्षांचा नीलकंठ भानू प्रकाश जगातील सर्वात वेगवान मानवी कॅलक्युलेटर ठरला आहे.
लंडनमधील माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडच्या मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलं आहे.
माइंड स्पोर्ट ऑलिम्पियाडचं व्हर्चुअली आयोजन करण्यात आलं. यामध्ये भारतासह यूके, जर्मनी, यूएई, फ्रान्स, ग्रीस, लेबनान यासारखे एकूण 13 देश सहभागी झाले होते.
13 देशांतील 29 स्पर्धकांना नीलकंठ भानू प्रकाश यानं हरवलं आहे आणि या स्पर्धेत भारताला हे पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.
नीलकंठ भानू प्रकाश म्हणाला माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळालं आहे.
माझा मेंदू कॅल्युलेटरपेक्षा जलद काम करतो. वेगवान मानवी कॅलक्युलेटर म्हणून मी चार वर्ल्ड रेकॉर्ड आणि 50 लिम्का रेकॉर्ड केले आहेत, असं नीलकंठने सांगितलं.
गणित तज्ज्ञ स्कॉट फ्लँसबर्ग आणि शंकुतला देवी यांच्याप्रमाणे हा रेकॉर्ड तोडणं म्हणजे भारतासाठी खूप अभिमानास्पद आहे. जागतिक स्तरावरील गणितात भारताला मी उंचावर नेऊन ठेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला, असं नीलकंठ म्हणाला.
गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि इतर प्राचीन भारतीय गणिती तज्ज्ञांची प्रेरणा घेतल्याचंही त्याने सांगितलं.
नीलकंठ इतर मुलं, तरुणांनाही गणितं शिकवतो आणि गणिताला मेंदूला चालना देणारं साधन बनवण्यासाठी प्रोत्साहीत करतो.
इतकंच नव्हे विद्यार्थी, कार्पोरेटर, एन्टरप्रेनर्सना त्यांची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षित करतो. तो वर्कशॉप, सेमिनार्स आणि ट्रेनिंगही घेतो.