PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

18 जुलै : कोणताही गुन्हा कधीच लपत नसतो...कधी तो गुन्हा समोर येण्यास उशीर लागतो पण गुन्हा तो गुन्हाच असतो...अमेरिकेत अशाच एक प्रकरणाचं गुढ उकललं असून 30 वर्षांपूर्वी एका चिमुरडीसोबत केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. वापरलेल्या कंडोममुळे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. जाॅन मिलर असं या नराधमाचं नाव आहे. 1988 मध्ये आरोपी मिलरने एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून हत्या केली होती. 30 वर्षांनंतर पोलिसांनी डीएनएच्या आधारावर या नराधमाला अटक केली. मृत मुलीच्या आईने 1 एप्रिल 1988 साली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर तिन दिवसांनंतर मुलीचा मृतदेह घरापासून 32 किलोमीटर दूर अंतरावर आढळले होते. पण पोलिसांना कोणताही सुगाव न लागल्यामुळे 30 वर्षांपूर्वी कुणालाही अटक करता आली नाही. तब्बल 30 वर्ष आरोपी मिलर हा पोलिसांपासून वाचत राहिला. पण सार्वजनिक वंशावली विषयक वेबसाईटवर डीएनएच्या माहितीच्या आधारे पोलिसांना मिलरवर संशय आला. पोलिसांनी मिलरचे घर गाठले आणि त्याची चौकशी केली. पण त्याने उडावउडवीची उत्तर दिली. पण बोलता बोलता त्याने अप्रैल टिन्स्लेचा उल्लेख केला.

याच महिन्यात पोलिसांनी मिलर भोवती सापळ रचला. पोलिसांनी मिलरच्या घरातून कचरा गोळा केला आणि यात त्यांना वापरलेले कंडोम सापडले. वैद्यकीय चाचणी केली असता डीएनए जुळून आले. त्यानंतर पोलिसांनी मिलरला अटक केली. मिलरवर हत्या, लैंगिक अत्याचार आणि अपहरण करण्यापैकी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Trending Now