आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना हार्दिक-नताशा हे लव्ह बर्ड्स अधिकच रोमँटिक झाले आहेत.
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविकच्या (Natasa Stankovic) घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना हे दोन्ही लव्ह बर्ड्स अधिकच रोमँटिक झाले आहेत. (PHOTO - INSTAGRAM)
नताशाने आणि हार्दिकने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. यामध्ये नताशा निळाशार ड्रेसमध्ये खूपच छान दिसते आहे. तर हार्दिकने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पँट घातली आहे. (PHOTO - INSTAGRAM)
मोकळं आकाश, हिरवंगार गवत आणि डोक्यावर सूर्यकिरण अशा सुंदर वातावरणात दोघांनीही रोमँटिक पोझ दिल्या आहेत. (PHOTO - INSTAGRAM)
याआधी हार्दिकने घरीच काढलेला आपला फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये एका सोफ्यावर हार्दिक बसलेला आहे आणि प्रेग्नंट नताशा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे. तर त्यांच्या शेजारी त्यांचे तीन कुत्रेही आहेत. या फोटाला हार्दिकने फॅमिली असं कॅप्शन दिलं होतं. (PHOTO - INSTAGRAM)
जानेवारीत अभिनेत्रीने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी साखरपुडा करुन सर्वांना चकित केले होते. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. (PHOTO - INSTAGRAM)
त्यानंतर लॉकडाऊन दरम्यानही दोघे एकमेकांसोबत राहत होते. त्याचवेळी त्यांनी लग्न केल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर हार्दिकने नताशा प्रेग्नेंट असल्याची बातमी देऊन सर्वांना चकीत केलं होतं. हार्दिकने नताशाच्या बेबी शॉवरचेही फोटो शेअर केले होते. (PHOTO - INSTAGRAM)
नताशाच्या प्रेग्नन्सीबाबत सांगताना हार्दिकने नताशा आणि माझा एकत्र प्रवास खूपच सुंदर होता आणि आता हा अधिकच सुंदर होणार आहे. आमच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार असून त्याच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. (PHOTO - INSTAGRAM)