पाकिस्तानचा फास्ट बॉलर ताबिश खान (Tabish Khan) याला झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ताबिशचं वय 36 वर्ष 146 दिवस आहे.
मुंबई, 8 मे : जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं देशाकडून खेळण्याचं स्वप्न असतं. एखाद्या क्रिकेटरचं हे स्वप्न वयाच्या 16 व्या वर्षीच पूर्ण होतं. तर कुणाला अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. पाकिस्तानचा फास्ट बॉलर ताबीश खान (Tabish Khan Debut) याला देखील मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यानं झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पदार्पण केलं आहे. (फोटो – ताबिश खान इन्स्टाग्राम)
ताबिश खान उजव्या हाताचा फास्ट बॉलर असून तो गेल्या 19 वर्षांपासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. 2002 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पन करणाऱ्या ताबिशनं 598 विकेट्, घेतल्या आहेत. इतक्या वर्षांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटनं त्याला पदार्पणाची संधी दिली आहे. (फोटो – ताबिश खान इन्स्टाग्राम
ताबिश खान पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा वयस्कर खेळाडू आहे. ताबिशनं 36 वर्ष 146 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. पाकिस्तानकडून मिरान बख्शनं 1955 साली 47 वर्ष 284 दिवस वय होतं तेंव्हा पदार्पण केले होते. तर आमिर इलाहीनं 44 वर्ष 45 दिवस वय होतं तेंव्हा 1952 साली पदार्पण केले आहे. (फोटो – ताबिश खान इन्स्टाग्राम)
हरारे टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर पाकिस्ताननं 4 आऊट 268 रन केले. पाकिस्तानकडून आबिद अली, अझर अली यांनी शतक झळकावलं. मात्र कॅप्टन बाबर आझम फ्लॉप ठरला. (फोटो – एफपी)