JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / KKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा!

KKR च्या 'या' स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा!

पॅट कमिन्सनं (Pat Cummins) भारतामधील कोरोनाग्रस्तांसाठी 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 37 लाख 36 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

0105

मुंबई, 10 मे: कोरोना विरुद्धच्या लढाईत मदत करुन भारतीयांचं मन जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) लवकरच बाबा होणार आहे. त्याची होणारी बायको बॅकी बोस्टन हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली आहे. (Becky Boston Instagram)

जाहिरात
0205

कमिन्स आणि बॅकीनं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. बॅकीनं तिचा प्रेगन्सीचा फोटो शेअर केला आहे. ‘मी ही आनंदाची बातमी लपवू शकत नाही, बेबी बोस्टन कमिन्स लवकरच आपल्यासोबत असेल,’ असं तिनं सांगितलं.

जाहिरात
0305

आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमधील (IPL 2021) 7 मॅचमध्ये 9 विकेट्स घेणारा कमिन्स सध्या मालदीवमध्ये आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर कमिन्स आणि अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला गेले आहेत. (Pat Cummins/Instagram)

जाहिरात
0405

ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.

जाहिरात
0505

डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडी वॉर्नरनं ही सनसनाटी बातमी असून दोघांचं अभिनंदन अशा शुभेच्छा दिल्या आहेत. कमिन्सनं भारतामधील कोरोनाग्रस्तांसाठी 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 37 लाख 36 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या