डिलीव्हरी बॉय गाडीजवळून दूर गेलेला पाहताच रिक्षाचालकाने त्याची बॅग उचलून नेली.
कुरिअर देण्यासाठी आलेल्या तरुणाची गाडीला अडकवलेली बॅग पळवल्याची घटना चंदिगढच्या सेक्टर 21 मध्ये घडली आहे.
डिलीव्हरी बॉय गाडीजवळून दूर गेलेला पाहताच रिक्षाचालकाने त्याची बॅग उचलून नेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
कुरिअर बॉय पार्सल देण्यासाठी आला तेव्हा रिक्षावाला त्याच्यावर नजर ठेवून होता. पार्सल देण्यासाठी जाताच गाडीजवळ ठेवलेली बॅग घेऊन रिक्षावाला पळून हे गेला.
या बॅगमध्ये 32 पार्सल होते ज्यात किंमती वस्तू होत्या. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत.